ठाणे :ठाणे शहरातील सूरसुदान शौर्य स्वर संस्था एक नवीन कार्यक्रम ‘ नमस्यु मुंबई ‘ सर्व रसिक प्रेक्षकांसाठी लवकरच घेऊन येत आहे. ज्यामध्ये आपल्या लाडक्या मुंबई शहराचे दर्शन बहारदार संगीत आणि  नृत्य इ. च्या मार्फत दाखवले जाणार आहे.
मुंबईच्या जडणघडणीत ज्यांचा मोलाचा, सिंहाचा वाटा आहे अशा व्यक्तींचा कार्यावर सदर कार्यक्रमातून प्रकाश झोत टाकण्यात येणार आहे.ह्यात मुंबईची संस्कृती आणि भौगोलिक संस्कृतीची नवीन पिढीस नव्याने ओळख करून देण्याचा प्रयत्न करणार आहोत व त्यांचा कार्याला सलामी म्हणून हा आमचा प्रयत्न आहे.
हा कार्यक्रम येत्या २५ मार्च ला दादर येथील श्री शिवाजी मंदिर नाट्यगृह येथे सायंकाळी ७.३० वाजता सुरु होईल.
ह्या कार्यक्रमाच्या जाहिरातीचे  अनावरण आणि कार्यक्रमाची घोषणा राज्याचे नगर विकास मंत्री श्री. एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते दि. १४ फेब्रुवारी, २०२० रोजी  त्यांच्या ठाण्याच्या निवास स्थानी करण्यात आले.  श्री शिंदे यांनी संस्थेचे अध्यक्ष सागर जोशी आणि संस्थेच्या सचिव नम्रता ओवळेकर राणे यांना भरभरून शुभेच्छा दिल्या. ह्या प्रसंगी ठाणे जिल्हा प्रमुख श्री गोपाल लांडगे उपस्थित होते. संस्थेचे सदस्य व गायक नंदन जोशी, दत्तप्रसाद आंबर्डेकर, प्रतिक जाधव, तानिया इ. गायक मंडळी उपस्थित होते.
ह्या कार्यक्रमाबद्दल अधिक माहितीसाठी संपर्क करा:-
सागर  जोशी :- ९०२२०३५३९७

नम्रता ओवलेकर राणे :- ९९२०७८१७००

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here