मुंबई  : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ठाकरे सरकारने  मोठं गिफ्ट देण्याचा निर्णय घेतला. सरकारी नोकरदारांना यापुढे दर शनिवार-रविवार सुट्टी मिळणार आहे. केंद्राच्या धर्तीवर आता राज्यातही पाच दिवसांचा आठवडा करण्याला बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. पाच दिवसांचा आठवडा व्हावा यासाठी तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिले होते. त्यानुसार आता निर्णय घेण्यात आला आहे. येत्या 29 फेब्रुवारीपासून या निर्णयाची अंमलबजावणी होईल.
सत्तेवर येताच पाच दिवसांचा आठवडा करण्यासाठी सरकार विचाराधीन असल्याचं मुख्यमंत्र्यांनी  सांगितलं होतं. फडणवीस सरकारच्या काळापासूनच सरकारी कर्मचाऱ्यांची ही मागणी होती. त्यासाठी निवेदनं देण्यात आली होती. कामाचा वेळ 45 मिनिटं वाढवून, अत्यावश्यक सेवा वगळून तसंच कामकाजाच्या दृष्टीने कुठलाही परिणाम होणार नाही अशा प्रकारचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले होते. लवकरच निर्णय घेण्यात येईल, असं आश्वासनही मुख्यमंत्री
राज्यात रिक्त पदे भरण्यासाठी कार्यवाही सुरू असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.
या मागण्या मान्य

मंत्रालयात महिलांसाठी विश्रामकक्ष, महिला अधिकाऱ्यांसाठी चक्राकार पद्धतीने होणाऱ्या बदल्यांबाबत धोरण ठरविणे, विश्रामगृहांमध्ये महिला अधिकाऱ्यांसाठी आरक्षण ठेवणे या मागण्या यावेळी मुख्यमंत्र्यांनी मान्य केल्या. ज्या मागण्यांवर तातडीने निर्णय होणे शक्य आहे त्या प्रलंबित ठेवू नका अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here